मुंबई - मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल (गुरुवारी) चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याच्या निर्णय घेण्यात आला. यावर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. दिवंगत नेते आर. आर. आबा यांनी उभी बाटली आडवी करत आणलेली दारूबंदी ही महाविकास आघाडी सरकारने शेवटी रिचवलीच, अशा तिखट शब्दांमध्ये त्यांनी दारूबंदीवर हल्लाबोल केला आहे. या सरकारने परत चार हात करायची वेळ आणली आहे. त्यामुळे संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या रहा, या शब्दात त्यांनी महिलांना आवाहन केले आहे.
चित्रा वाघ यांनी केलेले ट्विट हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळ : नुकसानग्रस्तांसाठी २५२ कोटींचे पॅकेज जाहीर; मंत्री उदय सामंत यांची माहिती
भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचा -
राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि अवैध दारुविक्री या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यावरून आता विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. भाजपाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यासंदर्भात ट्विट करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी दारूबंदीसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देत चित्रा वाघ यांन राज्य सरकारवर टीका केली आहे. या सरकारने परत चार हात करायची वेळ आणली आहे. त्यामुळे संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या रहा, या शब्दात त्यांनी महिलांना आवाहन केले आहे.
हा निर्णय दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस
चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा -निर्बंध वाढणार मात्र टप्प्याटप्प्याने काही निर्बंध कमी करणार