महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेस्टॉरंट आणि कसिनो एकच; राऊतांच्या पोस्टवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण - sanjay raut on bjp

Chandrashekhar Bawankule Casino Post : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'एक्स'वरुन एक पोस्ट करत थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय. यावरुन भाजापानंही संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. तर आता खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या प्रकरणात स्पष्टीकरण दिलंय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 4:32 PM IST

Updated : Nov 20, 2023, 5:00 PM IST

मुंबई Chandrashekhar Bawankule Casino Post : संजय राऊत (Sanjay Raut Casino Post) यांच्या पोस्टवरुन आता ठाकरे गट व भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संजय राऊत यांच्या एका दाव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विदेशात कसिनोमध्ये जुगार खेळल्याचा दावा राऊतांनी केलाय. याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केलाय. मकाऊमधील हा फोटो असल्याचं सांगण्यात येतंय. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया : मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबियांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय.

संजय राऊत यांची पोस्ट : १९ नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ, veneshine. साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? अशी पोस्ट संजय राऊत यांनी 'एक्स'वर केली. त्यामुळं आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी 27 फोटो बाहेर काढले तर त्यांना दुकान बंद करावं लागेल. राज्यातील परिस्थिती काय सुरू आहे, याचे मला भान आहे. मी व्यक्तीगत टीका केली नाही, पण सुरुवात तुम्ही केली. माझ्यावर भाजपाचे संस्कार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपाचे प्रत्युत्तर : राऊतांच्या पोस्टनंतर महाराष्ट्र भाजपानेही पोस्ट करत प्रत्युत्तर दिलंय. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की? असा सवाल उपस्थित करत, आदित्य ठाकरेंचा फोटो पोस्ट केलाय.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्राच्या राजकारणातलं द्युत; राऊतांनी पोस्ट केला बावनकुळेंचा जुगार खेळतानाचा फोटो, आणखी २७ फोटोंसह ५ व्हिडिओ असल्याचा दावा
  2. 'हा सामना भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नाही तर भाजपा विरुद्ध ऑस्ट्रेलिया होता', राऊतांचा घणाघात
Last Updated : Nov 20, 2023, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details