मुंबई- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अचानक भेट घेतली. या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शुक्रवारीच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीचा प्रस्ताव दिल्यानंतर पाटील यांनी आज घेतलेली ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीवर राजकीय तज्ज्ञांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी आज(शनिवारी) दुपारी राज्यपालांची अचानक भेट घेतली. या त्यांच्या भेटीचा कार्यक्रम नियोजित नव्हता. त्यामुळे नेमकी भेट कशासाठी होती, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना केलेल्या अटकेच्या नंतर भाजपाकडून राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या न्यायालयातील सुनावणीनंतर अर्णव यांना फार मोठा दिलासा मिळाला नाही. त्यामुळे या एकूणच प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना मदत आणि आचारसंहितेबाबत चर्चा-