महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे कर्तृत्व पाहून संधी देऊ - चंद्रकांत पाटील

अहल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर, माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे,  माजी आमदार संदेश कोंडविलकर आदींनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By

Published : Sep 22, 2019, 9:01 PM IST

मुंबई - गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या समाज घटकांसाठी आखलेल्या कल्याणकारी योजनांमुळे सामान्य माणसांचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढू लागला आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, प्रवेश करणाऱ्यांचे कर्तृत्व पाहून संधी देऊ, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

अहल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर, माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे, माजी आमदार संदेश कोंडविलकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी राज्यमंत्री बापुसाहेब थिटे यांचे पुत्र राजेंद्र थिटे, कल्याण महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अनिल पंडित, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे दिनेश तावडे, मुंबई तेली साहू समाजाचे अध्यक्ष अशोक साहू, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले, भाट समाजाचे अध्यक्ष भूषण गांगुर्डे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपत प्रवेश केला.

माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे यांनी भाजपात प्रवेश केला.

हेही वाचा- भाजपला महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, धनंजय मुंडेंचा प्रहार

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, की भाजपच्या यशामुळे विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळेच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्द्ल विरोधक शंका घेऊ लागले आहेत. मात्र, देशाच्या सुरक्षिततेसाठी योजलेले कडक उपाय, सामान्य माणसाच्या हितासाठी घेतलेले अनेक निर्णय यामुळे जनतेला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि भाजपविषयी विश्वास वाटू लागलेला आहे. भाजपात प्रवेश करणाऱ्यांना त्यांचे कर्तृत्व पाहून कामाची संधी दिली जाईल.

हेही वाचा- प्रकाश आंबेडकरांचा 'एकला चलो'चा नारा, काँग्रेस-राष्ट्रवादीचे किती उमेदवार राहणार विजयापासून 'वंचित'?

यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details