मुंबई Ashish Shelar :धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज (१६ डिसेंबर) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावीत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावरून आता मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. एकदा 'ठाकरे डिमांड रुपया' (TDR) त्यांना मिळाला की 'यु टर्न' घेण्याचा मार्ग मोकळा, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी टीका केली.
उध्दव ठाकरे म्हणजे यु-टर्न : आशिष शेलार म्हणाले की, "उबाठा नेहमीच विकासाच्या विरोधात काम करतं. प्रकल्प अडवून कटकमिशन वसूली करणारे मुंबईकरांसाठी नाही तर कटकमिशन साठी संघर्ष करत आहेत. यांच्या सरकारच्या काळातच धारावीच्या पुनर्विकासाचं टेंडर निघालं. उध्दव ठाकरे (UT) म्हणजे यु-टर्न. आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या, त्यातून प्रत्येक वेळी यु-टर्न घेतले आहेत. आता त्यांनी धारावी पुनर्विकासाला विरोध करण्याची भूमिका घेतली. 'यु टर्न फेम' उध्दव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तो ही 'टी जंक्शन' वरूनच. म्हणजे कुठल्याही बाजूला वळायची सोय आहेच", असा चिमटा आशिष शेलारांनी घेतला.