महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करेल' - रेडीरेकनरचे दर न्यूज

भाजपा नेते आशिष शेलार यांनी रेडीरेकनरचे दर या विषयावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत एन. ए. टॅक्सच्या नोटिसा सामान्यांना येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करेल, अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

bjp leader ashish shelar fire on maha vikas aghadi government
'सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करेल'

By

Published : Dec 13, 2020, 3:05 PM IST

मुंबई -राज्य सरकारने मुंबईकर जनतेवर आसूड ओढले आहेत. रेडीरेकनरचे दर कमी करू असे आश्वासन सरकारने दिले. मात्र बिल्डरांना त्याचा फायदा होईल, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. सामान्य मात्र याचा काही फायदा नाही. अगोदरच्या फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत एन. ए. टॅक्सच्या नोटिसा सामान्यांना येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करेल, अशा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी सरकारला दिला आहे.

आशिष शेलार बोलताना...
आशिष शेलार म्हणाले की, मुंबईतील कलेक्टर लँडवरील ज्या जमिनी क्लास 2 मध्ये येतात. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणी येत असल्याने गेली 20 वर्षे आंदोलने सुरू होती. अशा जागा क्लास 1 मध्ये करून फ्री करण्याचा धोरणात्मक निर्णय भाजपा सरकारने घेऊन मध्यवर्गीयांना दिलासा होता. तिघाडी सरकारने त्याला स्थगिती दिली.पुढे शेलार म्हणाले की, रेडीरेकनरची फाईल, युडीसीआर, प्रिमियम सवलतीच्या फाईल मधून "लक्ष्मीदर्शन" करुन बिल्डर लॉबीच्या झोळ्या भरणाऱ्या ठाकरे सरकारचे मुंबईतील मध्यमवर्गीयांसाठी खिसा कापू धोरण आखला आहे. हजारो गृहनिर्माण सोसायट्यांना या "स्थगिती सरकारचा" फटका बसणार आहे. आम्ही या मुंबईकरांसाठी लढू. असा इशारा भाजपाकडून दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details