नागपूर -शहरात प्रवासी वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ अहंकारापोटी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली असल्याचा आरोप भाजप नेते अमित साटम आणि आशिष शेलार यांनी केला. सरकारने स्थगिती तत्काळ उठवून मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी देखील त्यांनी केली.
'सरकारने अहंकारापोटी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली' - आमदार अमित साटम
सरकार एकीकडे आरेला जंगल घोषित करू, असे सांगते. मात्र, आरेमध्ये निवासी आरक्षित देण्याचे देखील सभागृहात बोलतात. त्यामुळे सेना हे व्यावसिकांसाठी तर करीत नाही ना? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.
कांजूर मार्गाला मेट्रोचे कार शेड व्हावे, अशी मागणी होत आहे. ती जमीन 3 ते 4 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. आरेच्या शासकीय जागेवर कुठलेही आरक्षण नाही. मात्र, त्याठिकाणचे २ हजार ४४६ झाडे तोडू नका. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत आहे, अशी ढोंगी भूमिका शिवसेना घेत असल्याचा आरोप देखील साटम यांनी यावेळी केला. सरकारने स्थगिती तत्काळ उठवून मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी देखील त्यांनी केली.
सरकार एकीकडे आरेला जंगल घोषित करू, असे सांगते. मात्र, आरेमध्ये निवासी आरक्षित देण्याचे देखील सभागृहात बोलतात. त्यामुळे सेना हे व्यावसिकांसाठी तर करीत नाही ना? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.