महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपा नेते अ‌ॅड. आशिष शेलार यांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण - शरद पवार आशिष शेलार भेट मुंबई बातमी

भाजपा नेते ॲड. आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर परत निघताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. या भेटीच्या माहितीचे एक ट्वीट सुळे यांनी केले असून त्यात भेटीचा फोटोही टाकला आहे. या भेटीने राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

Breaking News

By

Published : Aug 11, 2020, 7:08 PM IST

मुंबई :भाजपाचे वरिष्ठ नेते व माजी शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर परत निघताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. या भेटीच्या माहितीचे एक ट्वीट सुळे यांनी केले असून त्यात भेटीचा फोटोही टाकला आहे. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने क्रिकेट आणि त्यासाठीच्या मॅचेसच्या घडामोडींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेलार यांनी ही भेट घेतली असल्याचे सांगण्यात येते. तर, दुसरीकडे ही भेट नवीन राजकीय समीकरणाची नांदी असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चर्चेला उधाण

मागील काही दिवसांमध्ये राज्यात सुरू असलेल्या विविध राजकीय घडामोडी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना आणि मध्ये सुरू करण्यात आलेल्या दुधाच्या प्रश्नावर शेलार आणि पवार यांच्यात बराच वेळ चर्चा झाली असल्याचेही सांगण्यात येते. तर, शेलार हे अनेकदा पवारांना भेटत असून त्यांच्या विविध विषयांवर चर्चा होत राहतात. मात्र, तुर्तास क्रिकेट या विषयावरच चर्चा झाली असावी असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details