मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या या वर्षात मोठ्या प्रमाणात चर्चत राहिले. महाविकास आघाडीतील नेत्यांवर त्यांनी घोटाळ्याचे आरोप केले. परिणामी काही नेत्यांवर यामुळे चौकशी देखील सुरू झाली आहे. नव्या वर्षात पुन्हा एकदा घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya warned) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विट (Kirit Somaiya Tweet) मध्ये पाच नेत्यांची नावे जाहीर केली आहेत.
Kirit Somaiya : नव्या वर्षात ‘त्या’ पाच नेत्यांचा हिशोब चुकता करणार; किरीट सोमय्यांचा इशारा - उद्धव ठाकरे
भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांनी नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पाच नेत्यांना ट्वीटद्वारे इशारा (BJP Kirit Somaiya warned) दिला आहे. यात त्यांनी महाविकास आघाडीतील कॉग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही पक्षांतील नेत्यांची नावे जाहीर करत हिशोब चुकता करणार, असे म्हटले आहे.
सोमय्यांचा या नेत्यांना इशारा :उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसॉर्ट प्रकरण किरीट सोमय्या यांच्या रडारवर असणार आहे. यासह राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, कॉग्रेसचे नेते अस्लम शेख आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते या पाच नेत्यांच्या तथाकथित घोटाळ्यांचा पाठपुरावा करत आहेत. त्य़ामुळे आगामी वर्षात या सर्व नेत्यांचा हिशोब चुकता करणार, असा इशारा त्यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.
काय आहे सोमय्यांच्या ट्वीटमध्ये? : उद्धव ठाकरे कुटुंबाचे कोकणातील 19 बंगले. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडीओ, किशोरी पेडणेकरांचे झोप़पट्टी पुनर्वसन मधील सदनिका, तसेच, मुंबई महानगरपालिकेतील घोटाळे, या गोष्टी नव्या वर्षामध्ये आपल्या निशाण्यावर असतील, असे किरीट सोमय्या यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.