महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Keshav Upadhaye : राज्यपालांना परत पाठवण्याच्या मुद्द्यावर भाजपचे मौन, सुधांशु त्रिवेदींचीही केली पाठराखण - उद्धव ठाकरे

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये ( BJP Keshav upadhaye) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीबाबत केलेल्या आव्हानावर भाष्य करण्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, लोकशाही नव्हे तर शिल्लक पक्ष वाचवण्यासाठी ठाकरेंची धडपड सुरु असल्याची टीका त्यांनी केली. राज्यपालांना परत पाठवणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर बोलणे टाळले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 21, 2022, 5:21 PM IST

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्याचे ( Governor Controversial Statement ) पडसाद उमटत आहेत. राज्यपालांना तत्काळ महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. भाजपकडून मात्र या मागणीवर मौन पाळण्यात आला. तर भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा माफी मागितल्याचे विधानावर प्रबोधनकारांच्या 'दगाबाज शिवाजी' या पुस्तकावर काय बोलणार असे, सांगत राज्यपालांची पाठराखण केली.


भाजपकडून पाठराखण -भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे लोकशाहीबाबत केलेल्या आव्हानावर भाष्य करण्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, लोकशाही नव्हे तर शिल्लक पक्ष वाचवण्यासाठी ठाकरेंची धडपड सुरु असल्याची टीका त्यांनी केली. राज्यपालांना परत पाठवणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर बोलणे टाळले. तर सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याची पाठराखण करताना, छत्रपती शिवाजी महाराज कायम प्रेरणा देणारे वक्तव्य आहेत. कोणाच्या मनात काही शंका नाही. प्रत्येक पिढीसाठी ते आदर्श राहतील. मात्र, सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याबाबत बोलायला गेले तर, प्रबोधन ठाकरे यांच्या दगाबाज शिवाजी बाबत काय म्हणायचे, असे सांगितले.

उद्धव ठाकरेंवर टीका - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा संयुक्त कार्यक्रम रविवारी पार पडला. उद्धव ठाकरेंनी यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे, असे राज्यातील जनेतला आवाहन केले. भाजपचे प्रवक्त केशव उपाध्ये यांनी ठाकरेंचे लोकशाहीबाबतचे विधान म्हणजे मोठा विनोद आहे. तसेच उरला- सुरला शिल्लक पक्ष वाचवण्यासाठी ठाकरेंचा प्रयत्न सुरु आहेत. बाळासाहेबांच्या नावाशिवाय उद्धव ठाकरेंनी काहीच केले नाही, अशी टीका उपाध्ये यांनी केली.


लोकशाही बाबतचे विधान एक विनोद - शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरेंनी पक्ष टिकवण्यासाठी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेल्या संभाजी बिग्रेड सोबत युती केली. नक्षलवादींशी हात मिळवला. कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसच्या सोनिया गांधीसमोर गुडघे टेकले. तसेच सत्तेसाठी स्वाभिमान सोडून दिला, असा हल्लाबोल केशव उपाध्ये यांनी केला. उद्धव ठाकरे केवळ लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारतात. स्वतःच्या पक्षात लोकशाही शिल्लक आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. आज शिवसेना सत्तेपर्यंत पोहचण्यामागे बाळासाहेबांची पुण्याई आणि भाजपच्या सोबतीमुळे शक्य झाल्याचे केशव उपाध्ये यांनी सांगितले.


टिकली प्रकरणावर गळे काढले - संभाजी भिडे यांनी टिकली प्रकरणावर भाष्य केल्यानंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महिला आयोगाने सुमोटोची कारवाईचे आदेश दिले. मात्र, सुप्रिया सुळे यांनी महाष्ट्रातील संस्कृती जपावी, साडी पेहराव करण्याचे विधान केले. यावरुन पुन्हा एकदा रान उठले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टिकली प्रकरणावर गळे काढणारे आज गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा गेल्या कुठे असाही प्रश्न त्यांनी विचारला.

ABOUT THE AUTHOR

...view details