मुंबई -मुंबई महापालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) सफाई विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती धोकादायक असल्याने रिक्त केल्या जात आहेत. या इमारती डिसेंबरमध्ये रिक्त केल्या जात असून त्याबदल्यात तुटपंजे भाडे दिले जाणार आहे. यामुळे पालिका सफाई कामगारांच्या ( Municipal cleaners ) सुमारे सहा मुलांना शालेय शैक्षणिक वर्ष अर्धवट ( Educational loss of children of scavengers ) सोडावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळवीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीकडून आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
Fasting of BJP : सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरासाठी भाजपचे उपोषण - Educational loss of children of scavengers
मुंबई महापालिका( Mumbai Municipal Corporation ) सफाई कामगारांच्या ( Municipal cleaners ) वसाहती धोकादयक असल्याने खाली करणायात येत आहे. या सर्वांचा परिणाम सफाई कामगारांच्या मुलांवर होणार आहे. सुमारे सहा हजार मुले यामुळे प्रभावीत होणार असून त्यांचे शैकक्षणिक नुकसान ( Educational loss of children of scavengers ) होणार आहे.
विद्यार्थ्यांचे होणार नुकसान - मुंबई महानगरपालिकेत २९ हजार ६१८ सफाई कामगार काम करत आहेत. या सफाई कामगारांसाठी पालिकेने मुंबईत ४६ वसाहती बांधल्या होत्या. त्यात सुमारे ६ हजार सेवा निवासस्थाने होती. त्यापैकी काही सेवा निवासस्थान असलेल्या इमारती धोकादायक झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. ४६ पैकी ३६ वसाहतीमधील ४ हजार ५०० सेवा निवासस्थाने इमारती धोकादायक झाल्याने १५ ते २१ डिसेंबरपर्यंत रिक्त करण्याची नोटीस पालिकेने बजावली आहे. या इमारती रिक्त केल्यावर कामगारांना १४ हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. मात्र इतक्या कमी भाड्यात मुंबईमध्ये आपण राहात असलेल्या विभागात घर कसे मिळणार असा प्रश्न कामगारांना सतावत आहे. एकीकडे पालिकेने दिलेल्या भाड्याच्या रकमेत घर मिळणार नसल्याने परवडेल अशा ठिकाणी भाड्याच्या घरात जावे लागणार आहे.
१८ हजार कोटींचा भ्रष्टाचार - पालिका कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळावीत म्हणून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना आणण्यात आणली होती. त्यामधून सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळणार होती. मात्र, सफाई कामगारांना सेवा निवासस्थान देण्यासाठी इमारतींचा पुनर्विकास करण्याची योजना आणली. त्यात १८ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आम्ही समोर आणले होते. सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे द्यावीत अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. हे उपोषण भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा रोहिदास लोखंडे यांच्या उपस्थितीत चिंचपोकळी येथे करण्यात आले.