मुंबई - शिवसेना-भाजपच्या जागा वाटपाबाबत मातोश्रीवर चर्चा सुरू होती. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मागाठाणे येथील विजयी संकल्प मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाही, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही - उद्योग मंत्री सुभाष देसाई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
युती होणारच, भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे ठाम मत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मांडले. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
उद्योग मंत्री सुभाष देसाई
हेही वाचा - राम कदम यांच्या विरोधात काँग्रेसचे मराठी कार्ड
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विजयी संकल्प मेळाव्यासाठी सुभाष देसाई उपस्थित होते. युती होणारच, भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे ठाम मत देसाई यांनी मांडले. मागील पाच वर्षांत शिवसेनेचे मंत्री कुठल्याही घोटाळ्यात अडकले नाहीत. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न करत असल्याचे सुभाष देसाई म्हणाले.