महाराष्ट्र

maharashtra

भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर; 'या' दिग्गजांचा आहे समावेश

By

Published : Oct 1, 2019, 1:13 PM IST

Updated : Oct 1, 2019, 3:50 PM IST

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.

विधानसभा

मुंबई - विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बहुचर्चित नवी मुंबई बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान जवळपास १२ उमेदवारांचे पत्ते कट करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना नागपूर विधानसभा मतदार संघाकडून उमेदवारी मिळाली आहे. तर, चंद्रकांत दादा पाटील यांनी कोथरुडमधून उमेदवारी मिळाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांना बालारपूर येथून उमेदवारी मिळाली आहे. बबनराव लोनीकर यांना परतूर येथून उमेदवारी मिळाली आहे. आशिश शेलार यांना बांद्रा येथून उमेदवारी मिळाली आहे. राम कदम यांना घाटकोपर येथून उमेदवारी मिळाली आहे. जयकुमाक गोरे यांना मान येथून उमेदवारी मिळाली आहे. संभाजीराव निलंगेकर यांना निलंगा येथून उमेदावारी मिळाली आहे.

१२५ जणांची पहिली यादी जाहीर
भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर
भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर
भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर
भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर
Last Updated : Oct 1, 2019, 3:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details