मुंबई - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात युवकांवर इंग्रजांनी जो अत्याचार केला त्यापेक्षा जास्त भारतीय जनता पार्टी करत आहे. नागरिकत्व (सुधारणा) कायदा हा देशविरोधीच असून या विधेयकाला आमचा विरोध आहे. या विरोधात मूक मोर्चा काढणार आहोत, असे राष्ट्र सेवा दलाचे नेते अतुल देशमुख यांनी सांगितले.
नागरिकत्व (सुधारणा) कायद्यावरून देशात वातावरण तापले आहे. अनेक संघटनांनी याला विरोध केला आहे. मुंबईमध्ये 19 डिसेंबरला राष्ट्रीय सेवा दलातर्फे या कायद्याविरोधात भायखळा ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी हेही सहभागी होणार आहेत.