मुंबई - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपच्या गोटात दाखल झाले होते. भाजप-शिवसेना युतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे चित्र दिसत असल्याने स्वपक्षात विविध कारणे देत काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपच्या वळचणीला आले. भाजपकडून आज जाहीर झालेल्या यादीमध्ये अनेक आयारामांना संधी मिळाली आहे.
हेही वाचा -भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर; 'या' दिग्गजांचा आहे समावेश
राधाकृष्ण विखे-पाटील
विधानसभेत विरोधी पक्षनेता असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांचा मुलगा डॉ. सूजय विखेंनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटलांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि मंत्रिपदही मिळवले होते. आता त्यांना भाजपकडून शिर्डी मतदारसंघाचे तिकीट मिळाले आहे.
हर्षवर्धन पाटील
इंदापुरातील राष्ट्रवादीच्या भूमिकेचे कारण देत काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची भाजपने इंदापूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदार संघांचे सलग चार वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग तीन वेळेस अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
राणा जगजितसिंह पाटील
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीत सिंह यांनी राष्ट्रवादीला राम-राम ठोकत गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना तुळजापूर मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. शरद पवारांचे जवळचे नातेवाईक आणि पवारांचे बोट पकडून राजकारणात आलेले नेते, अशी पद्मसिंह पाटील यांची ओळख होती.
हेही वाचा -पक्षांतर करणाऱ्या भामट्यांना मत नाही तर 'लाथा' मारा - बच्चू कडू
वैभव पिचड