महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या संकटात मुंबईकरांवर पाणीपट्टी वाढीचा बोजा नको; भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी - मुंबई महानगरपालिका पाणीपट्टी न्यूज

यंदाच्या वर्षीही पालिका प्रशासनाने पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. याला भाजपाने विरोध केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांची आर्थिक अवस्था बिकट आहे. राज्य सरकारने वीज बिल वसूल करू नये, असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेने नागरिकांवर पाणीपट्टीचा भुर्दंड पाडू नये, अशी मागणी भाजपचे नेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

bjp demands water bill do not increased during covid 19 pandemic
कोरोनाच्या संकटात मुंबईकरांवर पाणीपट्टी वाढीचा बोजा नको; भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

By

Published : Jun 17, 2020, 8:18 AM IST

मुंबई- लॉकडाऊन असल्याने नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई तर कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईकर एकीकडे कोरोनाशी मुकाबला करत असताना, त्यांच्यावर पाणीपट्टी वाढीला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे पाणीपट्टी वाढ करू नये, अशी मागणी भाजपकडून महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

पाणी शुद्धीकरणावर प्रती एक हजार लिटरसाठी २४ रुपये खर्च येतो. मात्र मुंबईकर नागरिकांकडून प्रति हजार लिटर मागे ३ ते ४ रुपये आकारले जातात. त्यामुळे जलवाहिन्यांची देखभालीपासून पाणीपुरवठा यावर होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ बसावा, म्हणून दरवर्षी ८ टक्के पर्यंत पाणीपट्टी वाढ करता यावी, असा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी ४ ते ५ टक्के पाणी पट्टीत वाढ केली जाते.

प्रभाकर शिंदे बोलताना...
यंदाच्या वर्षीही पालिका प्रशासनाने पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. याला भाजपने विरोध केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांची आर्थिक अवस्था बिकट आहे. राज्य सरकारने वीज बिल वसूल करू नये, असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेने नागरिकांवर पाणीपट्टीचा भुर्दंड पाडू नये, अशी मागणी भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबईला भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, विहार व तुळशी या सात धरणातून पाणी पुरवठा केला जातो. ही धरणे मुंबई बाहेर असल्याने जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणी मुंबईत आणले जाते. या जलवाहिन्यांची देखभाल, ब्रिटीशकालीन जलवाहिन्या बदलत नवीन जलवाहिन्या टाकणे, पुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध करणे यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतो.


हेही वाचा -महाविकास आघाडीचा भाजपला दणका, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नियुक्त्या रद्द

हेही वाचा -कोकणाचे हरवलेले वैभव आणि आर्थिक सुबत्ता पुन्हा मिळवून देऊ - प्रविण दरेकर

ABOUT THE AUTHOR

...view details