महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपकडून अनेक विद्यमान आमदारांचे पत्ते कट; 'या' नवीन चेहऱ्यांना संधी - election latest news

जाहीर केलेल्या यादीत भाजपने 12 विद्यमान आमदारांचे तिकीट कापून तिथे नवीन चेहऱयांना संधी दिली आहे.

bjp

By

Published : Oct 1, 2019, 2:59 PM IST

Updated : Oct 1, 2019, 3:40 PM IST

मुंबई - भाजपने आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढणार आहेत, तर चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून निवडणुकींच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच 12 विद्यमान आमदारांचे तिकीटही भाजपने कापले आहेत.

हेही वाचा - भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर; 'यांना' मिळाली उमेदवारी

यात पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून दिलीप कांबळे यांचे तिकीट कट करून सुनील कांबळे यांना तिकीट देण्यात आले आहे. तर, कोथरुड मतदारसंघातून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्या जागेवर चंद्रकांत पाटलांना तिकीट देण्यात आले आहे.

मतदारसंघ - विद्यमान आमदार - नवीन चेहरे

  • पुणे कॅन्टोन्मेंट- दिलीप कांबळे - सुनील कांबळे
  • कोथरुड - मेघा कुलकर्णी - चंद्रकांत पाटील
  • नागपूर दक्षिण - सुधाकर कोहळे - मोहन मते
  • आरणी (यवतमाळ) - राजु तोडसाम - संदीप धुर्वे
  • कल्याण पश्चिम - नरेंद्र पवार - जागा शिवसेनेला
  • चाळीसगाव - उन्मेश पाटील - मंगेश चव्हाण
  • शहादा - उदयसिंग पाडवी - राजेश पाडवी
  • कसबा - गिरीश बापट (खासदार)- मुक्ता टिळक
  • शिवाजीनगर विजय काळे - सिद्धार्थ शिरोळे
Last Updated : Oct 1, 2019, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details