महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारा आमदारांचे निलंबन राजकीय सुडापोटी - आमदार लोढा

महाविकास आघाडी सरकारने राजकीय सुडापोटी बारा आमदारांचे निलंबन केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. बारा आमदारांचे निलंबन व राजकीय ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरुन मुंबईतील भगोजी कीर स्मारकाजवपळ भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Jul 10, 2021, 2:54 PM IST

Updated : Jul 10, 2021, 4:49 PM IST

मुंबई -रद्द झालेले ओबीसीचे राजकीय आरक्षण आणि भारतीय जनता पक्षाचे निलंबित बारा आमदार या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाकडून दादर येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षण गेले असल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. तसेच राजकीय सुडापोटी 12 आमदारांचे निलंबन करण्यात आल आहे, असा आरोप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे.

बोलताना आमदार लाड

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केले आणि भाजपच्या बारा आमदारांना एका वर्षासाठी निलंबित केले याचा निषेध करण्यासाठी मुंबई भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड आणि कालिदास कोलंबकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पार पडले.

भागोजी कीर स्मारकाजवळ, दादर चौपाटी येथे आंदोलनाचे आयोजन केले करण्यात आले आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून राज्य सरकारवर टीका केली जाते. राज्य सरकारने वेळीच योग्य ती भूमिका घेतली नसल्याने सर्वोच्च न्यायालय ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. त्यामुळे याचा फटका समस्त ओबीसी समाजाला बसत असल्याचे यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. तसेच दोन दिवसीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांचे निलंबन राज्य सरकारने सूडापोटी केल्याचा आरोप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे.

बारा आमदारांच्या निलंबनाविरोधात जाणार न्यायालयात

दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या बाराही आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले असून या काळात होणाऱ्या नागपूर आणि मुंबई येथील अधिवेशनात येण्यास मज्जाव केला गेला. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून न्यायालयात जाण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा -मुंबईत दिराचा भावजयीवर अॅसिड हल्ला

Last Updated : Jul 10, 2021, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details