मुंबई - योग्य तो निर्णय घेऊन राज्यपाल यांना कळवणार असल्याचे अर्थमंत्री आणि जेष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच ४ वाजता पुन्हा भाजप कोअर कमिटीची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात होती. बैठक संपल्यानंतर मुनगंटीवार ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यपाल महोदयांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला आमंत्रित केले आहे. आज आता आम्ही बैठक घेतली यात या निमंत्रणाच्या संदर्भांत चर्चा झाली. ४ वाजता पुन्हा यांसंदर्भात चर्चेसाठी बैठक होणार आहे. तसेच आम्ही योग्य तो विचारविनिमय करून राज्यपालांना निरोप देणार आहोत. ४ वाजेची बैठक संपल्यानंतर आम्ही माध्यमांसमोर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.