महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप उमेदवार मनोज कोटकांच्या बाईक रॅलीत "स्वच्छ भारत अभियान"ला हरताळ - election

रॅलीची सुरुवात करताना बाईकवर भाजपा, शिवसेना, रिपाईचे झेंडे लावण्यात येत होते. रॅली सुरू झाल्यावर रॅली मुलुंडच्या दिशेने निघाली. त्यानंतरही राजकीय पक्षांचे झेंडे आणि कोटक यांचे पोस्टर रस्त्यावर टाकण्यात आले होते. इतकेच नव्हे तर खाऊचे बॉक्स देखील रस्त्यावर टाकण्यात आले होते.

भाजप उमेदवार मनोज कोटकांच्या बाईक रॅलीत "स्वच्छ भारत अभियान"ला हरताळ

By

Published : Apr 22, 2019, 10:07 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा संदेश घराघरात पोहचवला. मात्र, त्यांच्याच पक्षातून ईशान्य मुंबई (उत्तर पूर्व) मतदार संघातून निवडणूक लढवणारे मनोज कोटक यांच्या बाईक रॅलीदरम्यान कचऱ्याचे ढीग रस्त्यावर टाकण्यात आले. त्यामुळे हेच का स्वच्छ भारत अभियान? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजप उमेदवार मनोज कोटकांच्या बाईक रॅलीत "स्वच्छ भारत अभियान"ला हरताळ
उत्तर पूर्व मतदार संघाचे खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे मनोज कोटक यांनी म्हटले आहे. कोटक यांनी उत्तर पूर्व मतदार संघात पदयात्रा, रॅली, उद्यान रेल्वे स्थानक आदी ठिकाणी लोकांशी भेट घेत प्रचार सुरू ठेवला आहे.

रविवारी सायंकाळी कोटक यांच्या समर्थनार्थ घाटकोपर पंत नगर येथील बस डेपो पासून मुलुंड पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीमध्ये खासदार किरीट सोमय्या आणि उमेदवार मनोज कोटक सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात करताना बाईकवर भाजपा, शिवसेना, रिपाईचे झेंडे लावण्यात येत होते. रॅली सुरू झाल्यावर रॅली मुलुंडच्या दिशेने निघाली. त्यानंतरही राजकीय पक्षांचे झेंडे आणि कोटक यांचे पोस्टर रस्त्यावर टाकण्यात आले होते. इतकेच नव्हे तर खाऊचे बॉक्स देखील रस्त्यावर टाकण्यात आले होते. यामुळे घाटकोपर डेपो बाहेरील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details