महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप उमेदवाराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; प्रचारावेळी आली भोवळ - ramesh thakur news

मुंबईत सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असून घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच प्रचारात असलेले ठाकूर दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला मालवणी भागात पोहोचले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते.

भाजपच्या उमेदवाराला आली भोवळ

By

Published : Oct 7, 2019, 7:02 PM IST

मुंबई- मालाड येथील मालवणी मतदार संघात प्रचारात व्यस्त असलेले भाजप उमेदवार रमेश ठाकूर यांना अचानक भोवळ आल्याने एकच खळबळ उडाली. तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रचाराची दगदग भाजपच्या उमेदवाराला आली भोवळ

हेही वाचा-उद्धव ठाकरेंची गर्जना, शिवसेनेचा 'मुख्यमंत्री' करणार म्हणजे करणारच!

मुंबईत सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असून घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच प्रचारात असलेले ठाकूर दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला मालवणी भागात पोहोचले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. मात्र, त्याच स्तिथीत ते मंचावर उभे राहिले. स्थानिक कार्यकर्त्याचे भाषण सुरु असतानाच ठाकूर भोवळ येऊन खाली कोसळले. 21 ओक्टॉबरला राज्यात मतदान होणार असून प्रचारासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक उमेदावार हा मतदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी बऱ्याच उमेदवारांचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याचेही सांगितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details