मुंबई - विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त १०५ जागा मिळूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबईतील वसंत स्मृती येथे भाजपची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकित संघटनात्मक निवडणुकांच्या कार्यक्रमाबरोबर मुंबई पालिकेच्या निवडणूक कामालाही सुरुवात केली असल्याचे वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली
विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त १०५ जागा मिळूनही सत्तेसापसून दूर राहीलेल्या भाजपने आता मुंबई महानगरपालिक निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबईतील वसंत स्मृती येथे भाजपची महत्वाची बैठक होत आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत होत आहे. महानगरपालिकेच्या २२७ वॉर्ड, मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघ आणि ६ लोकसभा क्षेत्रांच्या अध्यक्षांशी चर्चा केली जाणार आहे. मुंबईमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपला यावेळी विधानसभेत १७ जागा मिळाल्या असल्याचे शेलार म्हणाले.
या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांच्या कार्यक्रमावर चर्चा होणार आहे. तसेच येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्ती यावर चर्चा होणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच मुंबई पालिकेच्या 227 वॉर्डच्या कामाला सुरुवात झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.