मुंबई - 2017मध्ये पडलेल्या मुसळधार पावसात मुंबईची तुंबई झाली होती. यावेळी उघड्या मॅनहोलमध्ये पडल्यामुळे सुप्रसिद्ध डॉ. दीपक अमरापुरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युस सर्वस्वी महापालिका, प्रशासनाचा निष्क्रिय कारभार आणि दिरंगाई जबाबदार असल्याचा आराेप भाजपाने केला. क्लिव्हलँड बंदर येथील कामाची निविदा स्थायी समिती समोर असून हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा कालावधी लोटणार आहे. त्यामुळे क्लिव्हलॅन्ड बंदरच्या कामातील दिरंगाईचा फटका यंदाही बसणार असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार, भाजपाचा गंभीर आरोप - BJP alleges to Bmc
सद्यस्थितीत क्लिव्हलँड बंदर येथील कामाची निविदा स्थायी समिती समोर असून हे काम पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या कामाचा फायदा यावर्षीच्या पावसाळ्यात होणार नाही. मग प्रशासन या पावसाळ्यात काय व्यवस्था करणार? असा सवाल भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
29 ऑगस्ट 2017च्या पावसाळ्यात मृत्यू -
मुंबईत 29 ऑगस्ट 2017 राेजी झालेल्या मुसळधार पावसात लोअर परळ येथून चालत प्रभादेवी येथे आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले डॉ. अमरापूरकर यांचा दीपक टॉकीजजवळ मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू पालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळेच झाल्याचा ठपका तेव्हा साेशल मीडियाने ठेवला हाेता. या प्रकरणी मुंबईतील व्यापारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली हाेती. या याचिकेत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार विराेधात कारवाई करण्याची मागणी केली हाेती. या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना नाेटीस बजावली हाेती.
क्लिव्हलँड बंदर काम रखडले -
पालिका प्रशासनाकडून क्लिव्हलँड बंदर येथील पर्जन्य जलवाहिनी पातमुखावरील पूर नियंत्रण झडपा बदलण्यास तब्बल सहा वर्षे उशीर झाल्यामुळे वर्ष २०१५पासून समुद्राच्या भरतीच्या वेळी थोडासाही पाऊस पडल्यास भर पावसात समुद्राचे पाणी क्लिव्हलँड बंदर पातमुखातून शहरात शिरते. त्यामुळे प्रभादेवी, दीपक टॉकीज, एलफिन्स्टन रोड, सेनापती बापट या भागात पूर प्रवण परिस्थिती निर्माण होते. 29 ऑगस्ट 2017 रोजी भर पावसात समुद्राच्या भरतीच्या वेळी नादुरुस्त फ्लड गेट्स बंद होऊ शकली नाहीत. त्यामुळे समुद्राचे पाणी शहरात शिरले. या पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी मॅनहोलची झाकणे उघडली. या उघड्या मॅनहोलमध्ये पडल्यामुळे डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवी अंत झाल्याचा ठपका भाजपाने पालिका प्रशासनावर ठेवला आहे. सद्यस्थितीत क्लिव्हलँड बंदर येथील कामाची निविदा स्थायी समिती समोर असून हे काम पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या कामाचा फायदा यावर्षीच्या पावसाळ्यात होणार नाही. मग प्रशासन या पावसाळ्यात काय व्यवस्था करणार? असा सवाल भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.