मुंबई- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पश्चिम बंगालमधील रोड शो दरम्यान तृणमूल काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात भाजप कार्यकर्ते जखमी झाले. याचे पडसाद सध्या देशभर दिसत असून तृणमूल काँग्रेसने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
ममता बॅनर्जींच्या विरोधात मुंबईत भाजपचे आंदोलन - WB
या आंदोलनात प्रकाश मेहता, शायना एनसी यांच्यासह अतुल शाह सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधील अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान तृणमूल काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यात भाजप कार्यकर्ते जखमी झाले होते. याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले
ममता बॅनर्जींच्या विरोधात मुंबईत भाजपकडून आंदोलन करण्यात आले.
अमित शाह यांच्या रोड शोमध्ये झालेल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर भाजपकडून ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात येत आहे. यावर बुधवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आंदोलन केले.