मुंबई - विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सातत्याने कलगीतुरा बघायला मिळत आहे. राज्यपालांकडे बारा जणांची नावे पाठवलेले आहेत. मात्र, राज्यपाल दिरंगाई करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होत आहे. याच मुद्द्यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका 'आरटीआय' अहवालाचा उत्तर देत महाविकास आघाडी सरकारवर या प्रकरणावरून निशाणा साधला आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या या प्रकरणाला आता नविनच वळण मिळताना दिसत आहे. त्यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यांनी ट्विट केले आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, त्या बारा आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उत्तर मिळालेले आहे. प्रश्न होता प्रस्ताव कधी पाठवला? कोणती नावे पाठवली? काही उत्तर आले का? हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले आहे. मात्र, आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे, असा सवाल देखील भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमधून विचारलेला आहे.