रेल्वे तिकीट आरक्षित नसलेल्या प्रवाशांना मिळणार बायोमेट्रिकने सीट - रेल्वे प्रवासी
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे तिकीट आरक्षणासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या सर्व स्थानकांत राबवण्यात येणार आहे.
मुंबई सेंट्रल येथे तिकीट आरक्षणासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात आली आहे
मुंबई - लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आता विनाआरक्षित प्रवाशांना बायोमेट्रिक मशीनद्वारे तिकीट बुक करून सीट उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी होताना दिसत असून, लवकरच लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या सर्व स्थानकांत राबवण्यात येणार आहे.