मुंबई -तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीइकडून 29 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आलेले आहे. आज ते ईडीपुढे हजर झाले नाहीत. त्यांनी वकिलामार्फत आपले म्हणणे मांडले होते. तसेच हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता.
#MH BIG BREAKING : अनिल देशमुख यांना ईडी इकडून 29 जून रोजी हजर राहण्याचे समन्स
21:17 June 26
अनिल देशमुख यांना ईडीकडून 29 जून रोजी हजर राहण्याचे समन्स
18:36 June 26
'ताज'मध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल लहान मुलाने केल्याचे उघड; कराडमधील मुलाची चौकशी सुरू
मुंबई -मुंबईतील कुलाबा परिसरातील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी कॉल आला होता. दरम्यान, हा कॉल एका लहान मुलाने केला असल्याचे माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. हॉटेलच्या कार्यालयात सदरचा निनावी कॉल आला होता. या कॉलद्वारे ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर तत्काळ यासंदर्भात मुंबई पोलिसांना याची सूचना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने जाऊन तपासणी केली. सदरचा हा कॉल बनावट असल्याचे समोर आले आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ताज हॉटेलची तपासणी केली असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बॉम्ब आढळून आलेला नाही. ताजच्या मॅनेजमेंटला आलेला कॉल हा एका लहान मुलाने केला होता, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदर या कॉलद्वारे ताज हॉटेलमध्ये 2 बंदुकधारी व्यक्ती घुसणार असून, बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती.
16:51 June 26
मुंबईत 'ताज' हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन, सर्च ऑपरेशन सुरू
मुंबई - मुंबईतील गेट ऑफ इंडिया जवळील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन. हॉटेल ताज येथे बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन आल्यावर बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
15:29 June 26
प्रताप सरनाईक म्हणतात आजन्म शिवसेनेतच राहीन - संजय राऊत
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, आमच्यात केवळ संघटनात्मक विषयावर चर्चा झाली. विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर आघाडी स्थापन होत आहे त्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर प्रताप सरनाईक विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांना सांगितले की आजन्म शिवसेनेतच राहीन असे सरनाईक म्हणाले आहेत.
15:29 June 26
'आंदोलन करताना ओबीसी, बहुजन नेत्यांचा बळी का घेतला हे पण सांगा'; रोहिणी खडसेंचा ट्विटरवरून पुन्हा हल्ला
जळगाव - एकीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वर्तुळ ढवळून निघालेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंच्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. ओबीसी आरक्षणावरून अॅड. खडसे ट्विटरवर सातत्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य करत आहेत. भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनाला प्रत्युत्तर देताना त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट करत 'ते आंदोलन करताना खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा बळी का घेतला? हे पण सांगा ना...' असा सवाल उपस्थित केला आहे.
15:11 June 26
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले - देवेंद्र फडणवीस
मुंबई - ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाला असून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झालं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरजार हल्लाबोल केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण गेलं. राज्य सरकार आपल्या अपयशाचं खापर मोदींवर फोडते आहे अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेत्यांचं महत्त्व ताटातल्या चटणीएवढं अशी बोचरी टीका फडणवीसांनी मंत्रिमंडळात ओबीसी नेत्यांवर केली आहे.
15:10 June 26
सायन रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण
मुंबई -रुग्णाचा डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केला नाही. त्यामुळे उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. उपचार व्यवस्थित झाले नाही याचाच राग धरत नातेवाईकांनी डॉक्टरांसोबत वाद करत डॉक्टरला मारहाण केली. डॉक्टरांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्य़ास चालढकल करण्याचा प्रयत्न केला. अखेर चार तासानंतर गुन्हा नोंदवला गेला. आरोपीला समन्स बजावले असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. जर आरोपीला लवकर अटक झाली नाही तर मात्र आंदोलनाचे हत्यार काढावे लागेल, असा इशारा सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे.
12:43 June 26
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
12:43 June 26
काल (शुक्रवारी) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन बनावट कॉल सेंटर्सवर छापा टाकला होता. यानंतर हे सेंटर्स चालवणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
12:40 June 26
इकबाल कासकर याला एनसीबीने आज ठाणे न्यायालयात हजर केले
ठाणे - दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला एनसीबीने आज ठाणे न्यायालयात हजर केले आहे. अंमली पदार्थ सेवन आणि तस्करी प्रकरणी NCB अटक केली आहे. त्यानंतर आज कासकरला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
10:54 June 26
भाजपचे चक्काजाम आंदोलन : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त
10:32 June 26
कोकण रेल्वे पुन्हा मार्गस्थ
10:32 June 26
भाजपचे चक्काजाम आंदोलन : ठाण्यातून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
09:33 June 26
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी हजर होण्यास समन्स बजावले.
08:22 June 26
नागपूर -ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजपने केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) राज्यभर भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. नागपुरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आहे.
08:22 June 26
नागपूर - स्वतःच्या पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून तैनात असलेल्या 24 वर्षे तरुणीचे विनयभंग करत तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना रात्री पोलीस आयुक्तांनी निलंबित केले. तसेच ज्या पोलीस ठाण्यात मेश्राम कार्यरत होते, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही नोंदवण्यात आलेला आहे.
06:52 June 26
रत्नागिरी -कोकण रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेसला शनिवारी पहाटे ४.१५ वाजता करबुडे बोगद्यात अपघात झाला. हजरत-निजामुद्दीन मडगाव एक्सप्रेसचे इंजिन करबुडे बोगद्यातच रुळावरून घसरले आहे. त्यामुळे मडगाव एक्सप्रेस बोगद्याच्या आत एक किलोमीटरवर अंतरावर घसरले आहे.
06:12 June 26
ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे राज्यभर आंदोलन
नवी दिल्ली -परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ग्रीस येथे पोहोचले आहेत. तेथील परराष्ट्रमंत्री निकोस डेंडियास यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जयशंकर म्हणाले, आमच्या व्यापक युरोपियन यूनियनच्या प्रतिबद्धतेमध्ये ग्रीस हा एक महत्त्वाचा भागीदार आहे.