मुंबई :एमसी स्टॅन हा नुकताच बीगबॉस 16 चा विजेता झाला. बीगबॉसची ट्रॉफी त्याने आपल्या नावावर करू घेतली. एमसी स्टॅन हा एक रॅपर आहे. जो प्रामुख्याने हिंदीत गाणी लिहीतो. तो 2022 मध्ये बिग बॉस शोमध्ये एक स्पर्धक देखील होता. त्याच्या रॅपमुळे तो सर्वांच्या परिचयाचा आहे. बिग बॉस 16चा विजयी झाल्यानंतर एमसी स्टॅन याला ट्रफी, 31 लाख 80 हजाराची रक्कम व कार देण्यात आली.
एमसी स्टॅनचे करिअर :23 वर्षांचा एमसी स्टॅन त्याच्या अनोख्या कपड्यांच्या सेन्ससाठी ओळखला जातो. रॅप साँग्सच्या शैलींसाठी तो प्रसिद्ध आहे. त्यांचे काही रॅप साँग्स वादग्रस्त ठरले तेव्हा तो प्रकाश झोतात आला. समझ मेरी बात को या गाण्यापासून त्याच्या कामाची सुरूवात झाली. गाणे रिलीझ झाल्यानंतर काही दिवसांनी युट्यूबने ते काढून टाकले. सुरुवातीला त्याच्या ड्रेसिंग सेन्समुळे आणि भारतातील अनेक प्रसिद्ध रॅपरचा अनादर केल्यामुळे लोक त्याचा तिरस्कार करत होते. "अस्तगफिरुल्ला" हे गाणे त्याच्या आर्थिक समस्या आणि भूतकाळातील संघर्षांचे वर्णन करते. करिअरच्या सुरूवातीच्या स्टेन रस्त्यावर झोपायचा, खायला अन्न नसायचे. त्याच्या पैशाच्या समस्येमुळे तो गाणे रेकॉर्ड करू शकत नव्हता. त्याचे हे गाणे रिलीझ झाल्यानंतर त्याच्यावर टीका करणारे चाहत्यांमध्ये बदलले.