मुंबई:सेबीने नुकताच एक अंतरीम आदेश दिला असुन त्या नुसार रिलायन्स होम फायनान्स त्यांचे प्रवर्तक उद्योगपती अनिल अंबानी आणि इतर तीघांना लोकांकडून पैसे उभारण्याच्या कोणत्याच प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही असा आदेश दिला आहे. त्यानुसार त्यांना बाजारातील खरेदी विक्री किंवा कोणत्याही व्यवहारात प्रत्यभ अथवा अप्रत्यक्षपणे काम करता येणार नाही.
Big action of SEBI: रिलायन्स होम फायनान्स, अनिल अंबानी आणि इतर तिघांवर बंदी - शेअर बाजार नियामक सेबी
शेअर बाजार नियामक सेबीने मोठी कारवाई करत रिलायन्स होम फायनान्स (Reliance Home Finance Limited) त्याचे प्रवर्तक उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) आणि इतर 3 जणांना सिक्युरिटीजची खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, कोणत्याही प्रकारे पुढील आदेशा पर्यंत प्रतिबंध करत बंदी (market bans Reliance Home Finance) घातली आहे. त्यांना लोकांकडून पैसे उभे करण्याच्या कोणत्याच प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने रिलायन्स होम फायनान्स चे अनिल अंबानी आणि इतर तीन व्यक्तींवर कंपनीशी संबंधित कथित फसवणुकी वरुन रोखे बाजारातून ही बंदी घातली आहे. अंबानी आणि इतरांना पुढील आदेशापर्यंत सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थाशी, कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीशी किंवा सार्वजनिक कंपनीचे संचालक/प्रवर्तक म्हणून काम करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे असे सेबीने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. सेबी ने हे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा जारी केले. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला प्राप्त झालेल्या काही तक्रारी ज्यात कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापनाद्वारे पैसे काढणे, वळवणे आणि बँकांकडून अनेक फसवणूक मॉनिटरिंग रिटर्न्स प्राप्त केल्याचा आरोप आहे.