मुंबई Bhutan King Meet With Maha CM :भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारत भेटीवर आले आहेत. मंगळवारी त्यांनी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करुन त्यांना गणपती बाप्पा आणि महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवराय यांची मूर्ती भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली.
भारत आणि भूतानमध्ये सांस्कृतिक समानता :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी भारत आणि भूतानमध्ये अनेक सांस्कृतिक आणि पारंपारिक समानता आहेत. या दोन्ही देशात विविध क्षेत्रात एकमेकांच्या मदतीनं द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. दोन्ही देशाच्या द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्व सहकार्य करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही घेतली भेट :भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Bhutan King Meet With Pm Narendra Modi)यांचीहीभेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध विषयावर चर्चा केली. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे 3 ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. नवी दिल्लीत येण्यापूर्वी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी आसामलाही भेट दिली आहे.