महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

योगायोग...! आजी-माजी मुख्यमंत्र्याचा 'या' एकाच अधिकार्‍यावर विश्वास

भूषण गगराणी आणि विकास खरगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.

By

Published : Dec 9, 2019, 10:57 PM IST

cm uddhav thackeray and devendra fadnavis
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी भूषण गगराणी यांना एमआयडीसीच्या मुख्याधिकारी पदावरून थेट मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून साधारणतः एक वर्षापूर्वी नियुक्त केले होते. आता माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापाठोपाठ विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती कायम ठेवली आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्यावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखवल्याचा प्रकार दुर्मिळच असल्याची चर्चा मंत्रालयात सुरू झाली.

हेही वाचा -शरद पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी साजरा करणार 'बळीराजा कृतज्ञता दिन'

राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासनात फेरबदल करायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पदावर भूषण गगराणी आणि वन विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे यांची नियुक्ती केली आहे. गगराणी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणूनही काम केले आहे.

निपूण विनायक यांची नगरपालिका प्रशासन येथे आयुक्त आणि संचालक या पदावर नियुक्ती केली असून सचिन कुर्वे यांची महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती केली आहे. आनंद रायते यांची विक्रीकर विभागाच्या सहआयुक्त पदावर नियुक्ती केली. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक अमोल येडगे यांची अमरावती जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर, तर के. एच. बगते अतिरिक्त जिल्हाधिकारी सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details