मुंबई - कांद्यासाठी प्रसिद्ध परिवहन केंद्र असलेला मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग आता बांगलादेशात कांद्याची निर्यात करत आहे. कांद्याची पहिली मालगाडी 6 मे रोजी लासलगाव येथून रवाना झाली आहे. मध्य रेल्वेने 2 हजार 192 मालगाड्यांमधून 1 लाखापेक्षा अधिक वॅगन्सची मालवाहतूक केली आहे. लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वेने 5.5 दशलक्ष टन माल वाहतुकीसाठी लोड केला आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने बांगलादेशला केला कांदा निर्यात
मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग आता बांगलादेशात कांद्याची निर्यात करत आहे. कांद्याची पहिली मालगाडी 6 मे रोजी लासलगाव येथून निघाली.
कोरोनाचा सर्वत्र प्रसार झाल्याने रेल्वेने डॅमरेज आणि व्हारफेज शुल्कामध्ये सूट, मिनी रॅक्सच्या बुकिंगसाठी अंतर निर्बंधात सूट आणि टू पॉईंट रॅक प्रमाणित रेक रचनेत सूट या सवलीतींची घोषणा केली आहे.
वाणिज्य आणि ऑपरेटिंग विभागांकडून संभाव्य लोडर्ससह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सखोल विपणन बैठका घेण्यात आल्या. यामुळे बांगलादेशात (डारसाणा, बेनापोल आणि रोहनपूर स्थानकांत) कांद्याची निर्यात सुरू झाली. भुसावळ विभाग भारतीय रेल्वेवरील फुटुहा, डानकुनी, चांगसारी, मालदा टाऊन, चितपूर, इत्यादी विविध स्थानकांवर पाठविण्यासाठी कांदा लोड करतो.
कांद्याची निर्यात सुरू झाली आणि लासलगाव येथून प्रथम मालगाडी 6 मे रोजी निघाली. कांद्यांचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठवला गेला. लासलगाव ते बांगलादेशातील दरसाना येथे आणखी 6 मालगाडी लवकरच पाठवण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून भार भरणाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारानी दिलेल्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करून मालगाडी लोड केल्या जात आहेत.