मुंबई - स्वातंत्र्यत्रवीर सावरकरांवर केलेल्या ट्विट प्रकरणी राहुल गांधींची चौकशी करण्याचे आदेश मुंबईतील भोईवाडा न्यायालयाने दिले आहेत. ही चौकशी दादर पोलीस ठाण्याकडून चौकशी करण्यात यावी असेही न्यायालयाने म्हटले आहे.
राहुल गांधींच्या "त्या' ट्विट प्रकरणी पोलीस चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश हे ही वाचा -'प्रियांका गांधींना का पुढे आणत नाहीत सोनिया,' हा एक मोठा पेच - नटवर सिंह
2016 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर विनायक दामोदर सावरकर यांना हुकूमशहा म्हणून संबोधले होते. ज्यावर दिगवंत सावरकर यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. यानुसार सावरकरांचे नातू रणजित सावरकर आणि सावरकर स्मारक समिती यांनी मुंबईतील भोईवाडा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. यामध्ये भोईवाडा न्यायालयाने कलम 202 नुसार राहुल गांधी यांच्या ट्विटर वरील वक्त्यव्याचा दादर पोलिसांनी तपास करून न्यायालयात अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा -पंतप्रधान मोदींना चोर म्हटल्याने राहुल गांधींविरोधात गिरगाव न्यायालयात याचिका दाखल