महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरेगाव भीमा प्रकरण: ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून महाविकासआघाडीत ठिणगी - एनआयए तपास बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तपासाला मंजुरी दिली. तर गृह विभागाची भूमिका केंद्राकडे तपास न देण्याची होती. याबाबत मुख्यमंत्र्यांना ओव्हररुल करण्याचा अधिकार आहे, असे अनिल देशमुख यांनी नाराजीच्या स्वरात सांगितले. एकंदरीतच कोरेगाव भीमाच्या तपासावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव आहे.

bhima-koregaon-cases-crisis-in-shivsena-and-ncp-in-mumbai
कोरेगाव भीमा तपास

By

Published : Feb 13, 2020, 7:57 PM IST

मुंबई- सुरळीत चाललेला महाविकास आघाडीचा संसारात कोरेगाव भीमा दंगलीच्या तपासावरुन ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. कोरेगाव भीमाच्या दंगलीचा तपास एनआयएकडे देण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-मोबाईलमधील फोटो पाहिल्याच्या रागातून पतीने पत्नीला पेटवले; अहमदनगरमधील घटना

महाराष्‍ट्र सरकारने एनआयएला कागदपत्र हस्तांतरित करण्यास नकार दिला होता. याबाबत पुणे कोर्टात केस देखील सुरू आहे. आज दिवसभर याबाबत महाविकास आघाडीमध्ये खदखद सुरू होती. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तपासाला मंजुरी दिली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडत राज्य सरकार पुणे कोर्टामध्ये आपली बाजू मांडणार होते. यात गृह विभागाची भूमिका केंद्राकडे तपास न देण्याची होती. याबाबत मुख्यमंत्र्यांना ओव्हररुल करण्याचा अधिकार आहे, असे अनिल देशमुख यांनी नाराजीच्या स्वरात सांगितले. एकंदरीतच कोरेगाव भीमाच्या तपासावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव आहे.

दरम्यान, मुंबईतील सुरू असलेल्या सीएनआयसी विरोधातील आंदोलना मधील महिलांनी आज गृहमंत्र्यांचे भेट घेतली. त्यांचे आंदोलन बेकायदेशीर असून लवकरात लवकर आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना केले.

ABOUT THE AUTHOR

...view details