महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhima Koregaon Case : आरोपी गौतम नवलखा यांची मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव.. - भीमा कोरेगाव आरोपी गौतम नवलखा

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील ( Bhima Koregaon Case ) आरोपी गौतम नवलखा ( Gautam Navalkha ) यांची जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गौतम नवलखा यांना उपचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक महिना नजर कैदेत ठेवण्याचा नुकताच आदेश दिला होता. सध्या नवलखा नवी मुंबईतील घरी नजर कैदेत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 12, 2022, 10:40 PM IST

मुंबई:भीमा कोरेगाव प्रकरणी ( Bhima Koregaon Case ) आज झालेल्या सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेला गौतम नवलखा ( Gautam Navalkha ) यांच्या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

जामीन अर्ज फेटाळला होता: मागील महिन्यात विशेष न्यायालयाने नवलखा यांचाय जामीन अर्ज फेटाळून लावला होता. आरोपपत्रानुसार नवलखा यांच्याविरोधात पुरावे असून त्यांचा नक्षलवाद नवलखांचा या कथित गुन्ह्याशी संबंध असल्याचे स्पष्ट होते. नवलखांविरोधातील गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना जामीन मंजूर करता येणार नाही, असे निरीक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांनी नोंदवले आणि नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.


मुंबई उच्च न्यायलयात धाव: त्यानिर्णयाला नवलखांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या कटाचा भाग असल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी लागू केल्या जाऊ शकत नाही. जवळपास मागील चार वर्षापासून आपण अटकेत असून आपल्याविरोधातील खटला सुरू होण्याची शक्यता नाही. प्रकरणातील सहआरोपी आणि सध्या नियमित जामिनावर बाहेर असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्याप्रमाणे आपल्यालाही जामीन मंजूर करण्याची मागणी केली आहे.

सध्या मुंबईतील घरात नजरकैदेत:नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन लेखक आणि पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सचे माजी सचिव गौतम नवलखांसह इतर काही जणांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. नवलखांना 28 ऑगस्ट 218 रोजी अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवलखा यांना नवी मुंबईतील सध्या नवी मुंबईतील घरात नजरकैदेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details