मुंबई : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद (Bhima Koregaon and Elgar Parishad) प्रकरणातील आरोपी लेखक गौतम नवलखा (Gautam Navlakha released from jail) यांची कारागृहातून सुटकाकरण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session Court) विशेष एनआयए कोर्टातून नवलखा यांच्या सुटकेची ऑर्डर (release order) निघाली आहे. त्यांना नजर कैदेमध्ये ठेवणार येणार आहे.
आरोपी लेखक गौतम नवलखाची तळोजा तुरुंगातून सुटका नजर कैदेत ठेवणार : प्रकृतीच्या कारणास्तव तुरुंगात न ठेवता, लेखक गौतम नवलखा यांना घरात नजर कैदेत ठेवावं, हा मागणी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर त्यांची सुटका झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना तळोजा कारागृहातून आता एका वाचनालयात एक महिन्यासाठी नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. वृद्धत्व आणि प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना नवी मुंबई बेलापूर मधील आग्रोळी या गावातील कॉ. बी. टी. रणदिवे स्मारक ग्रंथालयात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आपल्याला तळोजा कारागृहातील न्यायालयीन कोठडीऐवजी स्वत:च्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी विनंती नवलखांनी सुप्रीम कोर्टाने केली होती. त्यानंतर कोर्टाने महाराष्ट्र सरकारला या प्रक्रियेसाठी आवश्यक तयारीचा आढावा घेण्यास सांगितले होते. हा आढावा पार पडल्यानंतर नवलखा यांना आग्रोळी गावातील ग्रंथालयात कडक सुरक्षा बंदोबस्तात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
नजरकैदेत ठेवण्याबाबत सुप्रिम कोर्टाने घातलेल्या अटी : नवलखा यांना कुठलाही मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच कोणतेही संवादाचे साधन वापरता येणार नाही. नवलखा यांना केवळ ड्युटीवर असलेल्या पोलिसांकडूनच दिलेल्या फोनचा वापर करता येईल, तोही पोलिसांच्या उपस्थितीत, दिवसातून एकदा, केवळ काही मिनिटांसाठी. शस्त्रधारी पोलिसांनी या नजरकैदेचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे.
यापुर्वीचा घटनाक्रम :नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखांसह इतर काही जणांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. नवलखांना 28 ऑगस्ट 2018 ला अटक करण्यात आली. तेव्हापासून नवलखा तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहेत. नवलखांचे वाढते वय आणि आजारांमुळे त्यांना घरात नजरकैदेत ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. तळोजा कारागृहात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असल्यामुळे तातडीने आणि योग्य उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे मला घरीच नजरकैदेत ठेवावे, अशी मुख्य मागणी करणारी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. यापुर्वी नवलखा यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. तसेच नवलखा यांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा तळोजा कारागृह अधिक्षकांनी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.
मेल द्वारे रिलीज पाठवली ऑर्डर : गौतम नवलखा यांच्या वकिलांकडून कारागृह अधीक्षक आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना ईमेल द्वारे रिलीज ऑर्डर पाठवण्यात आली होती.