मुंबई -जळगावच्या डॉक्टर पायल तडवी यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर सहा दिवस आंदोलन केले. त्याचप्रमाणे भीम आर्मीच्या वतीने मुंबईच्या नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी पायल तडवीच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपींना फाशी द्या, तडवीच्या कुटुंबीयांना सरंक्षण द्या, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
पायल तडवीच्या कुटुंबीयांना सरंक्षण द्या, भीम आर्मीची मागणी - demanded
न्याय व्यवस्थेने न्याय न दिल्यास दोन दिवसांत चंद्रशेखर आझाद मुंबईत येतील, असे यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. डॉक्टर पायल यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
पायल तडवीच्या कुटुंबीयांना सरंक्षण द्या, भीम आर्मीची मागणी
न्याय व्यवस्थेने न्याय न दिल्यास दोन दिवसात चंद्रशेखर आझाद मुंबईत येतील, असे यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. डॉक्टर पायल यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. मात्र, आरोपी डॉक्टरांच्या कुटुंबीयाकडून डॉ. पायलच्या कुटुंबाला धोका आहे. त्यामुळे त्यांना सरंक्षण द्या, अशी मागणी भीम आर्मीच्या आंदोलकांनी केली.