महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापौरांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मातोश्रीवर मोर्चा काढणार - भीम आर्मी - Mumbai

मुंबईच्या महापौरांनी येत्या दोन ते तीन दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणीही भीम आर्मीने केली आहे. महापौरांनी राजीनामा दिला नाही, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या वांद्रे कलानगर येथील मातोश्री बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

भीम आर्मीचे नेते

By

Published : Jul 14, 2019, 8:24 AM IST

Updated : Jul 14, 2019, 9:34 AM IST

मुंबई - पावसाळ्यामध्ये मुंबईत पाणी तुंबण्याच्या प्रकारावरून महापौरांनी केलेले 'बेपत्ता' वक्तव्य, गटारात पडून बेपत्ता झालेला दिव्यांश आणि मालाड येथील भिंत दुर्घटनेत झालेले मृत्यू याची जबाबदारी घेऊन मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा. अन्यथा आम्ही येत्या दोन ते दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर मोर्चा काढू, असा इशारा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी दिला आहे.

मुंबईत रोज कोणत्या ना कोणत्या दुर्घटना होत आहेत. पावसात पाणी साचून मुंबई तुंबत आहे. त्यानंतरही महापौर बेताल वक्तव्य करत असल्याने त्यांनी राजीनामा देण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. याबाबत बोलताना मालाडमध्ये भिंत कोसळून 29 जणांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी मुंबईत पाणी तुंबले तरी महापौरांनी पाणी तुंबलेच नसल्याचे बेताल वक्तव्य केले. आता चार दिवस झाले गोरेगाव येथील गटारात पडलेला दिव्यांश बेपत्ता आहे. मालाड येथील भिंत पडून झालेले मृत्यू, गटारात पडून बेपत्ता झालेला दिव्यांशला न्याय मिळवून देण्यासाठी महापौर अपयशी ठरले आहेत.

भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे

महाराष्ट्रात आणि पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने बसवलेला महापौर अकार्यक्षम असल्याची टीका भीम आर्मीने केली आहे. महापौरांना काडीचीही अक्कल नसल्याचे भीम आर्मीने म्हटले आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या महापौरांनी येत्या दोन ते तीन दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणीही भीम आर्मीने केली आहे. महापौरांनी राजीनामा दिला नाही, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्री बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे. यासाठी मुंबईकरांनी एकत्र यावे, असे आवाहनही कांबळे यांनी केले आहे.

Last Updated : Jul 14, 2019, 9:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details