महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhide Wada : भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंचं स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा, भाडेकरूंची १३ वर्षांपासून प्रलंबित याचिका फेटाळली

Bhide Wada : पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज (१६ ऑक्टोबर) फेटाळली. ही याचिका तब्बल १३ वर्षांपासून प्रलंबित होती. वाचा पूर्ण बातमी...

Bhide Wada
Bhide Wada

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 9:01 PM IST

मुंबई Bhide Wada : पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात स्थानिक पोट भाडेकरूंनी पुणे महानगरपालिका व राज्यसरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली.

भाडेकरूंनी आक्षेप घेतला होता : भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचं स्मारक व्हावं यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करत होती. मात्र यावर भिडे वाड्यातील काही पोट भाडेकरूंनी आक्षेप घेतला होता. त्यांनी याला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या खंडपीठानं फेटाळली. याबाबत आपली बाजू मांडण्यासाठी परिषदेनं विधिज्ञांची नेमणूक केली होती.

१३ वर्षांपासून याचिका प्रलंबित होती : पुण्यातील भिडे वाडा येथे ज्योतिबा फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे २०१० मध्ये येथे सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला होता. मात्र याला भिडे वाड्यातील काही पोट भाडेकरूंनी विरोध करत, इथे शाळा सुरू झाल्याचे पुरावे नाहीत, असं म्हटलं होतं. पुणे महापालिकेच्या या निर्णयाविरोधात तेव्हा याचिका दाखल करण्यात आली होती. तब्बल १३ वर्षांपासून प्रलंबित असलेली ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज (१६ ऑक्टोबर) फेटाळून लावली.

छगन भुजबळांनी पाठपुरावा केला : न्यायालयीन अडथळा आल्यामुळे हा विषय प्रलंबित होता. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, तसेच प्रख्यात पुरोगामी विचारवंत हरी नरके यांनी पाठपुरावा केला होता. हरी नरके यांनी येथे शाळा असल्याचे पुरावेही गोळा केले होते. तर छगन भुजबळ हे उच्च न्यायालयातील तारखांना स्वतः उपस्थित राहत होते.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut Vs Nitesh Rane : संजय राऊत यांच्या बदनामीचा खटला; नितेश राणेंना कोर्टाचं समन्स
  2. Chandrakant Patil Ink Throw : चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाईफेक, भाजपाविरोधात घोषणाबाजी; पाहा व्हिडिओ
  3. Vinayak Raut On Shinde Group : लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच 'मिंधे गटात मोठा भूकंप' - खासदार विनायक राऊत यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details