महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बविआचा महाविकास आघाडीला पाठिंबा, आमदारांनी शरद पवारांची घेतली भेट - बविआचा महाविकास आघाडीला पाठिंबा

बहुजन विकास आघाडीच्या तिनही आमदारांनी आज महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा जाहिर केला. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर व बोइसरचे आमदार राजेश पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेची भेट घेतली.

Bhaujan vikas aaghadi support to maharashtra vikas aaghadi
बविआचा महाविकास आघाडीला पाठिंबा

By

Published : Nov 27, 2019, 8:16 PM IST

मुंबई - बहुजन विकास आघाडीच्या तिनही आमदारांनी आज महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा जाहिर केला. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर व बोइसरचे आमदार राजेश पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. त्यांनतर त्यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला.

याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्वीटरद्वारे दिली. हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आभार मानले. या तिन्ही आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने संख्याबळ आणखी वाढले आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचीही या तिन आमदारांनी भेट घेत समर्थन देत असल्याचे सांगितले. अशोक चव्हाण यांनीही त्यांचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details