मुंबई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 वी जयंती निमित्त कांदिवली पूर्व येथील इ.एस.आय. रुग्णालयामध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी वॅक्सिन सेंटरचे उद्घाटन केले.
हेही वाचा -मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरूच, 9925 नवे रुग्ण, 54 रुग्णांचा मृत्यू

सुरुवातीला रुग्णालयामध्ये जवळपास 100 लोकांना रोज वॅक्सिन दिले जाईल, त्यानंतर ही संख्या वाढून 500 पर्यंत करण्याचा मानस आहे. कांदिवलीमध्ये वॅक्सिन सेंटर नसल्यामुळे नागरिकांना बसमध्ये बसून दहिसर पर्यंत यावे लागत होते. परंतु, आता हे वॅक्सिन सेंटर उघडल्यामुळे कांदिवली पूर्व येथे नागरिकांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वत्र परिस्थिती खराब आहे आणि मलाडमध्ये एका रुग्णालयाला ऑक्सिजन मिळाले नसल्यामुळे ते बंद करण्यात आले. यामुळे लोकांनासुद्धा आता बेड मिळत नाही. तसेच, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा काळाबाजार होते म्हणूनच आज पन्नास हजार इंजेक्शन गुजरातवरून आणण्यात आले आहेत. राज्य सरकारची व्यवस्था ठीक नाही.
हेही वाचा -बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाबाहेर शुकशुकाट