मुंबई :राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांपासून उद्धव ठाकरेंनी फारकत घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिंदे गटाकडून सतत उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेत येण्यासाठी पाठिंबा जाहीर केला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी यावरून शिंदे गटाला त्यावरून आता खिंडीत पकडले आहे.
अजित पवार यांना चांगलेच ऐकवले : अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसऱ्या दिवशी विधानसभेत शिंदे गटाचे आमदार व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी, नागालँडमध्ये परिवर्तन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी यावर हरकत घेतली. त्यानंतर तो मुद्दा विधानसभेत मोठ्या प्रमाणात गाजला. यावेळी यांची चर्चेची मागणीही अध्यक्षानी फेटाळून लावली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी यावर प्रसारमाध्यमांकडे भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांसह प्रामुख्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चांगलेच ऐकवले.