महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत भालकेंसह दौलत दरोडांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ

काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि  शिवसेनेच्या दौलत दरोडा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. भारत भालके हे पंढरपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. तर दौलत दरोडा हे शिवसेनेचे शहापूरचे माजी आमदार आहेत.

भारत भालके सह दौलत दरोडांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ

By

Published : Oct 1, 2019, 4:18 PM IST

Updated : Oct 1, 2019, 6:21 PM IST

मुंबई- काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि शिवसेनेच्या दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोघांचे स्वागत केले.

भारत भालके सह दौलत दरोडांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ

हेही वाचा-ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार, अर्षद वारसी वगळता बॉलिवूडकरांनी फिरवली पाठ

भारत भालके हे पंढरपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. तसेच त्यांचे सहकार क्षेत्रातही नाव आहे. तर दौलत दरोडा हे शिवसेनेचे शहापूरचे माजी आमदार आहेत. भालके आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. ते सर्वात आधी अपक्ष म्हणून निवडून आले होते. कालांतराने ते काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांना राष्ट्रवादीची विचारधारा पटली म्हणून आता ते राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. पांडुरंग बरोरा आणि त्यांचे वडील पवार साहेबांचे कट्टर समर्थक मात्र पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दौलत दरोडा यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते पांडुरंग बरोरा यांच्या आधी आमदार झालेत.

हेही वाचा-शरद पवार आणि पाच आश्चर्य !

अनेकजण पक्ष सोडून जात आहेत हरकत नाही. काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केली आम्ही हा खेळ संपवू असे, अजित पवार यांनी यावेळी बालताना सांगितले. आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही त्याबाबत मित्रपक्षांशी चर्चा करणार आहोत. सुप्रिया सुळे यांना पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिला होता. ती काही पंचवार्षिक निवडणूक नव्हती. आदित्य यांना सहकार्य करायचे ठरवलेच तर काँग्रेसशी चर्चा करणार कारण आधीच वरळीची जागा त्यांनी मागितली आहे. आघाडीची घोषणा २ ऑक्टोबरला होणार आहे. तीन वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल. काही मित्र पक्षांच्या जागांबाबत निर्णय घ्यायचा आहे ते झाले की आघाडी जाहीर करू, असेही पवारांनी सांगितले.

हेही वाचा-सुप्रियांच्या पहिल्या निवडणुकीतील मदतीची राष्ट्रवादीकडून 'अशी' होणार सेनेला परतफेड?

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून साताऱ्याची जागा राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादी ती जागा निवडत आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव काँग्रेसतर्फे चर्चेत आहे. ते जागा लढले नाही तर आम्ही लढू. लवकरच उमेदवाराची घोषणाही करू. बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जात आहे. त्यांना लढण्याचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्षाला कधीच कमकुवत समजत नाही. प्रत्येक उमेदवारांना आम्ही तुल्यबळ उमेदवार समजतो. कोणीही असूदे राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीची जागा एक ते दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आणणार असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी दाखवला.

Last Updated : Oct 1, 2019, 6:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details