महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत बंद : देशव्यापी संपाला संमिश्र प्रतिसाद - देशव्यापी संप

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात बुधवारी देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीतर्फे देशव्यापी संप आणि आंदोलन करण्यात आले. या 'भारत बंद'च्या आंदोलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात करण्यात आलेल्या संपात विविध कामगार संघटना, कर्मचारी, संघटनेनी सहभाग नोंदविला होता. राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या संपाचा संपूर्ण आढावा...

भारत बंद आंदोलन
भारत बंद आंदोलन

By

Published : Jan 9, 2020, 1:24 PM IST

मुंबई - मुंबईत बुधवारी 'भारत बंद' दरम्यान विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. या संपाला शहरवासियांनी संमिश्र प्रतिसाद दिला. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्याविरोधात विरोधी पक्षांच्या काही कामगार संघटनांनी आणि कर्मचारी संघटनांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता. यावेळी, सरकारी कार्यालये, बँकांमधील कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, या संघटनांचे कामगार मोठ्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले होते. यावेळी मोदी सरकार आणि कामगार विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भारत बंद आंदोलन

यासोबतच, आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएस, सीआयटीयू, एआयटीयूसी, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी या मुख्य कामगार संघटनांसह कित्येक प्रादेशिक संघटना या संपामध्ये सहभागी झाल्या होत्या. ऑल इंडिया बँक एम्प्लॉय असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी आणि बँक कर्मचारी सेना महासंघ या संघटनाही बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच, देशभरातील 175 शेतकरी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला. यामुळे मुंबईमधील बँकांचे आणि सरकारी कार्यालयाचे कामकाज मात्र, ठप्प झाले होते.

याच संपाला विविध विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी देखील मुंबईत पाठिंबा देत सहभागी झाले होते. यामध्ये छात्रभारती, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, CYSS, SFI, AISF, JAC, NSUI, PSU, AIPC, AYW, TISS student Union, SIO, NCP youth wing आणि मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच इतर संघटना, पुरोगामी आणि संविधानवादी विद्यार्थी संघटना निषेध करण्यासाठी आंदोलनात सामील झाल्या होत्या.

नवी मुंबई - नवी मुंबई शहरात भारत बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नवी मुंबईतील बाजारपेठ शाळा कॉलेज दुकाने तसेच नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही( ए पी एम सी मार्केट) सुरळीत सुरू होते.

ठाणे - भारत बंद आंदोलनाला ठाणे शहरातील नागरिकांवर फारसा परिणाम दिसला नाही. मात्र, विविध कामगार संगठनानी 'भारत बंद'ची हाक दिली होती. तर, रेल्वे सेवा, बस सेवा, रिक्शा तसेच विविध सरकारी कार्यालय सुरू होती आणि जनजीवन सामान्य होते.

पणजी -महाराष्ट्रासह गोव्यातही विविध कामगार संघटनांनी 'गोवा कन्व्हेन्शन ऑफ वर्कर्स' म्हणून एकत्रितपणे कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला पाठिंबा दिला. यासाठी पाटो-पणजी ते आझाद मैदान अशी फेरी काढण्यात आली ज्याचे रुपांतर आझाद मैदानावर जाहीर सभेत झाले. तेथे सर्वानुमते विविध ठरावांना मान्यता देण्यात आली. तसेच यावेळी कामगार सभेत कामगारांच्या प्रश्नांबरोबरच नागरिकत्व सुधारणा कायदा, म्हादई पाणी वळविणे, जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे आदी मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.

हेही वाचा - कामगार संघटनांचा देशव्यापी संप; मुंबईत शाळा, महाविद्यालयांसह वाहतूक सेवा सुरू

हेही वाचा -देशव्यापी बंदच्या निमित्ताने औरंगाबादेत हजारो कामगार उतरले रस्त्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details