मुंबई- सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन मुक्ती मोर्चाने आज भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला कुर्ल्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कुर्ला रेल्वे स्थानक पूर्व व पश्चिम परिसरात काही दुकाने बंद होती, तर काही चालू होती.
केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर सुधारित नागरिकत्व कायदा देशभरात लागू झाला. या कायद्याला काही राज्यांसह संघटना आणि नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. तर सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरू असलेले महिलांचे आंदोलन सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे.