महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 24, 2019, 1:23 PM IST

ETV Bharat / state

सभेनंतर आंबेडकरी अनुयायांचे शिवाजी पार्कवर स्वच्छता अभियान

वंचित बहुजन आघाडीच्या सभेनंतर भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी अनुयायांनी शिवाजी पार्क मैदान स्वच्छ करून नवा पायंडा सुरू केला.

शिवाजी पार्कवर स्वच्छता अभियान

मुंबई - वंचित बहुजन आघाडीच्या सभेनंतर भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी अनुयायांनी शिवाजी पार्क मैदान स्वच्छ करून नवा पायंडा सुरू केला. कार्यकर्त्यांनी मैदान स्वच्छ करून महापालिकेचा ताण कमी केला. तसेच रविवारी खेळाडूंना खेळासाठी मैदान मोकळे करून दिले आहे. या पूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आंबेडकरी अनुयायांनी मैदान स्वच्छ केले होते.

शिवाजी पार्कवर स्वच्छता अभियान


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात आठवडाभर लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी देशभरातून अभिवादन करण्यासाठी येतात. यावेळी कचरा केला जातो, अशी टीका केली जात होती. या टीकेला उत्तर म्हणून गेली काही वर्षे आंबेडकरी संघटना या परिसरातील कचरा एकत्र करून एका ठिकाणी आणून जमा करत आहेत. यामुळे मुंबई महापालिकेला कचरा उचलणे सोपे जात आहे.


शनिवारी शिवाजी पार्कवर भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. या सभेनंतर पाण्याचे ग्लास व बाटल्या, बसण्यासाठी वापरण्यात आलेली वृत्तपत्र आदी कचरा जमा झाला होता. सभा संपल्यावर जमलेला कचरा पाहून भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हा कचरा एकत्रित केला. या मैदानावर रविवारी खेळण्यासाठी खेळाडू येत असतात. सभेच्या वेळी बसण्यासाठी टाकण्यात आलेल्या हिरव्या मॅटही या कार्यकर्त्यांनी बाजूला काढून ठेवल्या. यामुळे खेळाडूंसाठी मैदान मोकळे झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details