मुंबई -भांडुप पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराला त्याच्याच परिसरात उभे करून त्याला तडीपार केल्याची दवंडी दिल्याची घटना घडली आहे. अतिष भरत कदम उर्फ सिद्धू, असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो भांडुपच्या टेंबिपाडा परिसरात रहातो.
भांडुप पोलिसांनी आरोपीला परिसरात उभे करून दिली तडीपार केल्याची दवंडी - भाडुप पोलीस
गेल्या काही महिन्यांत आरोपीने विविध प्रकारचे गुन्हे करून विभागाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातून मपोका कलम 56 नुसार 14 जानेवारीपासून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या गुंडाची दहशत कमी व्हावी म्हणून भांडुप पोलिसांनी त्याला टेंबिपाडा परिसरात दवंडी पिटून नागरिकांना माहिती दिली.

भांडुप पोलिसांनी आरोपीला परिसरात उभे करून दिली तडीपार केल्याची दवंडी

हेही वाचा - माजी नौदल अधिकारी पतीला जिवंत जाळणारी पत्नी पोलिसांच्या ताब्यात