महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Traffic Police : तळीरामांनो सावधान! मुंबई वाहतूक पोलीस वापरणार ब्रेथ एनालाइजर; मद्यपींना वचक

नववर्षाच्या स्वागताला मुंबईकर मोठ्या संख्येने ( Mumbai Traffic Police to Use Breathalyzer ) बाहेर पडतात. समुद्रकिनारी, चौपाटीवर, गेटवे आॅफ इंडिया येथे ( Beware Drunkards ) नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. यावेळी तळीरामांना वचक बसण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस ( Joint Commissioner of Police Praveen Padwal ) मोठा उपक्रम हाती घेतला आहे. आता प्रत्येक वाहनधारकाचे मुंबई पोलिसांकडून ब्रेथ एनालाइजर करण्यात येणार आहे. त्यामुळे तळीरामांनो सावधान, मुंबई वाहतूक पोलीस प्रत्येक वाहनधारकाची टेस्ट करणार आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 31, 2022, 10:46 PM IST

मुंबई : मागील दोन वर्षे कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करून घरातील ( Mumbai Traffic Police to Use Breathalyzer ) सोसायटी टेरेसवर नववर्षाचे स्वागत केले. मात्र, यंदा मुंबईकर ( Beware Drunkards ) मोठ्या संख्येने थर्टी फर्स्टच्या रात्री मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन वाहन चालवणे ( Joint Commissioner of Police Praveen Padwal ) वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलीस कडक कारवाई करणार आहेत. दोन वर्षांनंतर वाहतूक पोलीस ब्रेथ एनालाइजर या ब्रह्मास्त्राचा वापर करणार आहेत.

तळीरामांनो सावधान! मुंबई वाहतूक पोलीस वापरणार ब्रेथ एनालाइजर; मद्यपींना वचक

मुंबईकरांना नियमांचे पालन करण्याचे आवाहनसर्व मुंबईकरांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी केले आहे. त्याचबरोबर देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोकावत असताना पुन्हा वाहतूक पोलीस ब्रेथ एनालाइझर याचा वापर करणार आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कोरोनाचे सावट डोकावत असताना ब्रेथ एनालाइजरचा वापर कसा काय करणार, याबाबत अधिक माहिती जाणून घेतली आहे वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्याशी बातचीत करून.

तळीरामांनो सावधान! मुंबई वाहतूक पोलीस वापरणार ब्रेथ एनालाइजर; मद्यपींना वचक

शंभर ठिकाणी नाकाबंदीचे पॉइंट'ई-टीव्ही भारत'शी बातचीत करताना मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले की, शंभर ठिकाणी नाकाबंदीचे पॉइंट लावले गेले असून, पोलीस ब्रेथ एनालायझरचा वापर करणार आहेत. तसेच, मुंबईत होणारी गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनी रस्त्यांमध्ये बदल केले आहेत, तर काही ठिकाणी 'नो पार्किंग झोन' घोषित केले आहे.

ब्रेथ एनालायझरच्या वापराने मद्यपान केलेले वाहनचालक कळणारपुन्हा एकदा कोरोनाचे संकट देशावर डोकावत असताना ब्रिथ ऍनालायझरचा वापर वाहतूक पोलीस कसा काय करणार यावर प्रवीण पडवळ यांनी सांगितले की, ब्रेथ एनालायझर चा वापर केव्हा संशयित मद्यपान केलेल्या वाहन चालकाच्या तपासणीसाठी वापरण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यासाठी वापरण्यात येणारे नळकाडे प्रत्येक संशयित वाहन चालकासाठी नवे आणि स्वतंत्र वापरण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण बडबळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details