मुंबई -सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सट्टेबाजसुद्धा सक्रिय झाले आहेत. दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएलवर शहरात सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट 10ने ही कारवाई केली.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 10ला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील संपूर्ण हॉटेल या ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी मयूर जयंतीलाल छेडा (42) व जतिन निलेश शहा (36) या आरोपींना अटक केली.
हेही वाचा-आयपीएलवर सट्टा; रायगडात 11 जणांसह 17 मोबाईल ताब्यात
आरोपींना 28 नोव्हेंबर पर्यंत कोठडी
सट्टेबाजी करण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेऊन admin.lotusbook247.com या इंटरनेट वेबसाईटचा वापर करत क्रिकेट बेटिंग घेण्यास सुरुवात केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी एक मोबाइल फोन, बनावट सिमकार्ड, काही कागदपत्रे यांच्यासह बारा हजाराची रक्कम जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 28 नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.