मुंबई - बेस्ट उपक्रम वेतन करार केला जात नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे. असे असताना आज (मंगळवारी) महाव्यवस्थापकांबरोबर चर्चा निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी आज (मंगळवारी) रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा एल्गार...! मागण्या मंजूर होईपर्यंत बेमुदत उपोषणावर
बेस्ट उपक्रम वेतन करार केला जात नसल्याने 98% कामगारांनी संपाचा कौल दिला. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचे पुढचे पाऊल तीव्र करणार आहोत. वेतन करारासंदर्भात ठोस काही येत नाही तोपर्यंत लढाई सुरू राहणार असल्याचे बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रम वेतन करार केला जात नसल्याने 98% कामगारांनी संपाचा कौल दिला. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचे पुढचे पाऊल तीव्र करणार आहोत. वेतन करारासंदर्भात ठोस काही येत नाही तोपर्यंत लढाई सुरू राहणार असल्याचे बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. त्यासाठी मंगळवारपासून वडाळा आगार येथे बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे सांगत मागण्या पूर्ण होईपर्यंत इथून हटणार नाही त्यांनी स्पष्ट केले.
तर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज (मंगळवार) रात्रीपासून संपावर जाणार होते. मात्र, मुंबईकरांना वेठीस न धरता बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. वेतन करार ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जो पर्यत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव, जम कहार, नितीन पाटील, विलास पवार, डी.के.सिह आणि बेस्टचे कामगार वडाळा बसस्थानकासमोर बेमुदत संपावर बसले आहेत.